RTE Admission 2024-25 : आरटीई प्रवेशासाठी या दिवशी सुरु होणार ऑनलाईन अर्ज !! हे कागदपत्रे आत्ताच ठेवा तयार

RTE Admission 2024-25 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी (RTE Admission 2024-25 Maharashtra) महाराष्ट्र शासनातर्फे 25% जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात या आरटीई कायद्यांतर्गत संबंधित मुलांना पहिलीपासून दहावीपर्यंत मोफत शिक्षण पुरवले जाते.

दरवर्षी महाराष्ट्र शासन याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवते मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात ही प्रक्रिया चालू झाली होती तर यावर्षी काय तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया आणखी सुद्धा चालू झालेली नाही.

येत्या काही दिवसांमध्ये आरटीई ची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाऊ (RTE Admission 2024-25) शकते आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज ची लिंक खाली उपलब्ध आहे तसेच आवश्यक कागदपत्र आणि वयाच्या अटी कसे असतील याविषयीची माहिती सुद्धा तुम्ही खाली पाहू शकता.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांना प्राधान्य दिले जाते. गावाखेड्यामध्ये या कायद्याविषयी जागरूकता नसल्यामुळे याचा लाभ घेतला जात नाही शहरी भागामध्ये आरटीई प्रवेशासाठी खाजगी शाळांमध्ये रांगाच-रांगा लागलेल्या असतात.

तुम्हाला जर आरटीई मध्ये आपल्या पाल्याचे ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्या पाल्याचे वय कमीत कमी 3 वर्ष असणं आवश्यक आहे ते जास्तीत जास्त 7 वर्ष 6 महिने एवढा वेळ असेल तर तुम्ही या प्रवेश प्रक्रियेसाठी लाभ घेऊ शकता.

प्रवेशासाठी वयोमर्यादा (31 डिसेंबर 2024 रोजी)

  • प्ले ग्रुप/नर्सरी – 01 जून 2020 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान चा जन्म असावा आणि वय कमीत कमी 3 वर्ष व जास्तीत जास्त 4 वर्षे 6 महिने असावे.
  • ज्युनिअर केजी – 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान चा जन्म असावा आणि वय कमीत कमी 04 वर्षे व जास्तीत जास्त 05 वर्षे 06 महिने असावे.
  • सीनियर केजी – 01 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान चा जन्म असावा कमीत कमी वय 05 वर्ष जास्तीत जास्त 06 वर्ष 06 महिने असावे.
  • इयत्ता पहिली – 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान चा जन्म असावा वय कमीत कमी 06 वर्ष जास्तीत जास्त 07 वर्ष 05 महिने असावे.
वयोमर्यादेचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवले जातात आणि लॉटरी पद्धतीने पाल्याची निवड केल्या जाते यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अगोदर पासन जुळवाजुळव करून ठेवणं गरजेचं असते कारण ऐन वेळेला जर कागदपत्र नसतील तर तुमचं ऍडमिशन सुद्धा रद्द केले जाऊ शकते.

तुम्ही जे कागदपत्र सादर करणार आहेत ते कागदपत्र प्रवेश घेण्यापूर्वीच्या तारखेची असावीत त्यानंतरची जर कागदपत्र असतील तर ते स्वीकारले जाणार नाही त्याची नोंद घ्यावी.

आवश्यक कागदपत्रे (RTE Admission 2024-25)

  • बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे बालकांसाठी आवश्यक असतील.
  • वंचित गटातून येत असाल तर जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ असाल तर अनाथ बालकाचे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असेल. वंचित जात संवर्गातून येणारे उमेदवाराला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे गरजेचे आहे, तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, पगार पत्रक किंवा कंपनीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यामध्ये तुमचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल याची खात्री करावी.
कागदपत्राची यादी पाहण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
  • आरटीई मध्ये प्रवेश करते वेळेस आधार कार्ड गरजेच आहे आधार कार्ड नसेल तर आधार कार्डची पावती सोबत जोडणे अनिवार्य असेल, जर आधार कार्ड किंवा पावती जोडली नसल्यास असे अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत.
  • जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांचा दाखला, रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, घरपट्टी, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणता एक पुरावा तुम्ही जोडू शकता.
  • भाड्याने राहत असाल तर भाडे करार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणी कृत असावा. भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकच्या पूर्वीचा असावा त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असावा तरच हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल कागदपत्राची यादी तुम्ही वर दिलेल्या लिंक वरून पाहू शकता व ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची प्रक्रिया जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या (RTE Admission 2024-25)  आठवड्यामध्ये सुरू होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांनी अगोदरच आपले कागदपत्रे तयार करून ठेवावीत जेणेकरून वेळेवर तुमची कोणतीही धावपळ होणार नाही.

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment